नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केली असून, यात विशेषतः निवडणूक आयोगाने सायंकाळी ६ नंतर टाकलेल्या तब्बल ७६ लाख मतांचा डेटा जतन करून न ठेवण्याबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.
निवडणूक कायद्यानुसार प्रत्येक मताचा डेटा सुरक्षित ठेवणे अनिवार्य असताना, इतक्या मोठ्या संख्येतील मतांबाबतची माहिती उपलब्ध न ठेवणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. या पार्श्वभूमीवर उद्याची सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयात संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतदाना संदर्भातील न्यायालयीन लढाई ॲड. प्रकाश आंबेडकर हे लढत होते, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळ्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर हे सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई लढत आहेत.