प्रयागराज : प्रयागराज महाकुंभ दरम्यान मौनी अमावस्या (२९ जानेवारी न या महाकुंभ चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने न्यायिक चौकशी आयोगाची स्थापना केली होती.आता हा न्यायिक आयोग सामान्य नागरिकांचे जबाब नोंदवणार आहे. महाकुंभ २०२५ मध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी संगम नोजवर घडलेल्या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने नागरिकांकडून घटनेशी संबंधित साक्षीदार व व्हिडिओ मागवले आहेत. आयोगाने पुढील दोन आठवड्यांत हे साक्ष्य आणि व्हिडिओ प्रस्तुत करण्याचे आवाहन केले आहे.
कोणतीही व्यक्ती व्हॉट्सॲप नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे आयोगाला आपले साक्ष्य किंवा व्हिडिओ पाठवू शकते. याशिवाय, कोणीही थेट लखनऊ येथील विकास भवनातील कार्यालयात देखील हे साक्ष्य जमा करू शकतो. आयोगाने स्पष्ट केले आहे की, साक्ष्य देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल. मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या या चेंगराचेंगरीची चौकशी न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती करत आहे. या घटनेशी संबंधित साक्ष्य आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी आयोगाने व्हॉट्सॲप नंबर 9454400596 आणि ईमेल आयडी mahakumbhcommission@gmail.com जारी केला आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मते, “१३ जानेवारी (पौष पौर्णिमा) पासून सुरू झालेला महाकुंभ 2025, प्रयागराज येथे, २६ फेब्रुवारी महाशिवरात्री पर्यंत एकूण ४५ दिवसांत ६६ कोटी २१ लाखांहून अधिक श्रद्धाळूंनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करून पुण्य प्राप्त केले आहे.”