त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर महंतांकडून आगपाखड

0

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कारभारावरती आता साधू महंत देखील नाराज झालेले आहेत. त्यांची नाराजी देखील या निमित्याने समोर आलेली आहे. पण काहीही झालं तरीही त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सुधारण्याचे नाव घेत नाहीये हे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेले आहे. त्रंबकेश्वर मध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना मंदिराचे बाह्य दर्शन घडवा अशी मागणी महंत गणेशानंद सरस्वती महाराजांनी केली आहे. तसेच मंदिर व्यवस्थापन साधू महंतांना सहकार्य करीत नाही याबद्दल त्यांनी ट्रस्ट मंडळावर आगपाखड केली आहे.

त्रंबकेश्वर मध्ये सद्या मोठी गर्दी आहे. त्रंबकेश्वर मधील वाढती गर्दी लक्षात घेऊन बाह्य दर्शन सुविधा करावीयात भाविक मंदिरातील बाह्य भागाचे तसेच बाहेरील महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊ शकतात. त्रंबकेश्वर मंदिराची रचना लक्षात घेता मुखदर्शन सुविधा होणे अशक्य असले तरी बाह्य दर्शन सुविधातूनच एक प्रकारे भाविकांना मुखदर्शन सुविधा मिळू शकेल ट्रस्ट मंडळाने या वर विचार करावा अशी जोरदार मागणी गणेशानंद महाराजांनी केली आहे. जे भाविक दोनशे रुपयांचे तिकीट घेऊ शकत नाही अथवा वेळेअभावी रांगेत जाऊ शकत नाही अथवा स्वच्छ निबाह्य दर्शन घेऊ इच्छिता अशा भाविकांची यामुळे सोय होईल दर्शनास न मुकता दर्शन न करता परत भाविक जाणार नाही. तसेच गर्दीचे नियंत्रण देखील राहण्यास मदत होईल. स्वामी सागरानंद गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष त्रंबकेश्वर कुंभमेळ्यातील एक कार्यरत अनुभवी महंत तसेच आनंद आखाड्याचे महंत तसेच वारकरी संप्रदायात त्यांची मोठी ख्याती आहे.

सद्या उत्तर भारतीयांचा श्रावण सुरू आहे. त्रंबकेश्वरची ख्याती सर्व दूर पसरत असल्याने येथे मोठी गर्दी देखील होत आहे. चुकीच्या पद्धतीने भाविकांना दर्शन घडवले जात त्याच्या तक्रारी देखील वाढलेले आहेत. मंदिराशी संबंधित यंत्रणादेखील मूग गिळून असते असे ते म्हणाले.असे असताना साधू महंत त्यांचे सोबत एखादा भाविका आला तर त्याला सोडले जात नाही या ठिकाणी तैनात असलेली यंत्रणा साधूंकडे व त्याच्या सोबत असलेल्या भाविकाकडे दुर्लक्ष करते आधार कार्ड द्या विश्वसताना फोन लावा विश्वस्त फोन फोन उचलत नाही किंवा त्यांचा फोन बंद असतो . आम्ही पास काढण्यात देखील तयार आहोत फक्त भाविकाला दर्शन मिळू द्यावे एवढीच साधून कडून माफक अपेक्षा असते गुरु पौर्णिमेला आलेल्या भाविका बाबत त्यांना अयोग्य अनुभव आला. साधू साधू महंतान बद्दल अनादाराची भावना देवस्थान यंत्रणेची आहे का असा सवाल देखील त्यांनी केला.

इतर सर्वत्र ज्योतिर्लिंगांवर भाविकांंबाबत सहकार्याचे भूमिका व्यवस्थापनाची असते स्वतंत्र साधूंसाठी स्वतंत्र नियोजन देखील संबंधित ज्योतिर्लिंग मंडळे करतात. त्रंबक मध्ये असे काहीच नियोजन नाही निदान सहकार्य तरी हवे. त्रंबकेश्वर मध्ये मात्र विश्वस्तांचे नातेवाईक जातात पण कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस रुपये साधूंना सहकार्य करावे असे त्यांना वाटत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. गावकऱ्यांनी देखील अशाच अशा तक्रारी आहेत असे देखील ते म्हणाले. ठराविक लोकांचा देव असल्यासारखे वातावरण असते. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण त्र्यंबकेश्वर आहे अशा परिस्थितीत ट्रस्ट मंडळाची भूमिका अयोग्य असल्याचे त्यांनी सांगत तिखट शब्दात व्यथा मांडली आहे. मंदिर ट्रस्टच्या नियोजनाबाबत अखिल भारतीय स्तरावर असलेल्या आखाडा परिषदेला लक्ष घालण्याची वेळ येणार नाही याकडे शासनाने देखील लक्ष घालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech