रांची : भारताचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार धोनीने आपला ४४ वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. त्याने झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आणि केक कापला. भारताच्या महान कर्णधारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या धोनीला बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना बीसीसीआयने लिहिले की, ‘टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी… धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट खेळणारा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक.’ अशा शुभेच्छा बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यामातून धोनीला दिल्या आहेत.