राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनचा ‘चड्डी मोर्चा’ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

0

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ट्रॅक कॉम्पोनंट्स या कंपनीकडून स्थानिक कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक व मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनने ‘चड्डी मोर्चा’ काढला आहे.हा मोर्चा गुरुवार (दि.5 जून) मंत्रालय येथे पोहोचणार असून, मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याची माहिती आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी दिली. सोमवारी(दि.२) शहरातील कामगार उपायुक्त कार्यालय येथून थेट मंत्रालय गाठण्यासाठी चड्डी मोर्चा मुंबईकडे कूच झाला.या आंदोलनात शहरातील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत.या मोर्चातील कामगारांनी ६४ किलोमीटर अंतर पार करत मंगळवारी (दि.३) रात्री कसाऱ्यापर्यंत पोहोचला असून, बुधवारी (दि.4) शहापूरकडे ते कूच करणार आहेत.

या आंदोलनाची कंपनी प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोर्चा गुरुवार (दि.5 जून) मंत्रालय येथे पोहोचणार असून, मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात करत आहेत. स्थानिक कामगारांची अवहेलना करून बाहेरून मजूर मागवणे, कामगारांवर मानसिक दबाव आणणे, कंत्राटी कामगारांना विनासूचना कमी करणे तसेच युनियनशी संबंधित कामगारांवर वैयक्तिक कारवाई होणे अशा समस्या वाढल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कंत्राटी कामगारांना कायदेशीर सुरक्षा मिळावी, स्थानिक कामगारांविरोधातील बेकायदेशीर कंत्राट रद्द करावे, कंपनीवर अतिक्रमणाबद्दल तत्काळ कारवाई करावी.अनधिकृत पार्किंग, वृक्षतोडीविरुद्ध कारवाई करावी.युनियन सदस्यांचे निलंबन थांबवावे.सर्व कामगारांना कायम करावे. अपघातांबद्दल दोषींवर कारवाई करावी, आदी मागण्या कामगारांकडून करण्यात आल्या आहेत. आंदोलनात शहरातील विविध कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मंत्रालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech