तामिळनाडूत एमबीएच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

0

कोईम्बटूर : महिला सुरक्षेच्या दृष्टीने कुख्यात असलेल्या तामिळनाडूत विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. राज्याच्या कोईम्बटूर शहरात 3 गुंडांनी एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरणकरून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार कोईम्बटूरच्या खासगी महाविद्यालयात एमबीए करणारी ही विद्यार्थिनी आपल्या मित्रासह कारमध्ये असताना ३ गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. पिडीतेचे अपहरण करून तिला इतरत्रे नेले आणि सामूहिक बलात्कार केला. सध्या पिडीत तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि परिसरातील संभाव्य साक्षीदारांची चौकशी करत आहेत.

दरम्यान या प्रकरणानंतर भाजप नेते के. अन्नामलाई यांनी ट्विटरवर (एक्स) केलेल्या एका पोस्टमध्ये म्हंटले आहे की, डीएमके सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहे. यावरून असे दिसून येते की, गुंड आणि गुन्हेगारांमध्ये पोलिस आणि सरकारची भीती राहिलेली नाही. राज्यातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech