मुंबई : मुंबईत विमानाच्या महिला पायलटवर धावत्या कॅबमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन आरोंपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला तक्रारदार नामांकित एअरलाइन्समध्ये पायलट आहेत. १९ जूनला पतीला भेटून त्या रात्री १० .४५ च्या सुमारास फोर्ट येथून कॅबने घाटकोपरच्या दिशेने येत होत्या. यावेळी २५ मिनिटांच्या प्रवासानंतर चालकाने मार्ग बदलून दुसरीकडे गाडी थांबवून दोन अनोळखी व्यक्तींना गाडीत बसवले. त्यानंतर प्रवासादरम्यान वाटेत बसलेल्या या दोन अनोळखी व्यक्तीने दमदाटी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तपास सुरू केला आहे. तिच्या जबाबात बऱ्याच विसंगती असल्याचेही दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी तरुणीच्या आरोपावरून घाटकोपर पोलिसांनी चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. प्रवासादरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. या फुटेजच्या आधारे नेमका काय घडलं याला उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या घटनेमुळे कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.