ड्रग ओव्हरडोजमुळे दर आठवड्याला १२ जणांचा मृत्यू

0

एनसीआरबीच्या अहवालात पुढे आली धक्कादायक माहिती
नवी दिल्ली : ड्रग ओव्हरडोजमुळे देशभरात दररोज काही लोकांचा जीव जात आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) यासंदर्भात ताजे आकडे जाहीर केले आहेत. देशात २०१९ ते २०२३ या कालावधीत झालेल्या ड्रग ओव्हरडोजमुळे झालेल्या मृत्यूंचा यात उल्लेख आहे. या अहवालानुसार, देशात दर आठवड्याला १२ लोकांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोजमुळे होतो. एनसीआरबीच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये दर आठवड्याला सरासरी १२ लोकांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोजमुळे झाला आहे. तसेच २०१९ ते २०२३ या कालावधीत दररोज सुमारे २ जणांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोज हीच मुख्य कारण ठरली आहे. तथापि, या अहवालात फक्त ड्रग ओव्हरडोजमुळे झालेल्या निश्चित (कन्फर्म) मृत्यूंचाच समावेश करण्यात आला आहे. ड्रग ओव्हरडोजशी संबंधित अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत, त्यामुळे त्या आकडेवारीचा समावेश एनसीआरबीच्या अहवालात नाही.

प्रारंभीच्या आकडेवारीनुसार, तमिळनाडू या राज्यात ड्रग ओव्हरडोजच्या सर्वाधिक घटना नोंदल्या गेल्या होत्या, परंतु आता तेथील प्रकरणांमध्ये घट दिसून येत आहे. तसेच २०१९ मध्ये तमिळनाडूमध्ये ड्रग ओव्हरडोजमुळे १०८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०२३ मध्ये हा आकडा घटून ६४ वर आला आहे. दुसरीकडे, २०१९ मध्ये पंजाब या राज्याचे नाव टॉप ५ राज्यांमध्ये नव्हते, पण २०२२ मध्ये पंजाबमध्ये ड्रग ओव्हरडोजमुळे तब्बल १४४ लोकांचा मृत्यू झाला. तर २०२३ मध्ये हा आकडा घटून ८९ इतका नोंदवण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech