दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा – मंत्री अतुल सावे

0

मुंबई : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (ऑनलाईन) उपस्थित होते.

या बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी अनेक सूचना केल्या. यामध्ये राज्यात दुधाला समान दर, एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूधसंघ तसेच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी प्रतिनिधि नी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मंत्री अतुल सावे म्हणाले. मुंबईतील आरे स्टॉलचे अत्याधुनिकरण करण्यात येईल. असे सावे यांनी सांगितले. दूध संकलनासाठी शेतकरी प्रोड्युसर कंपन्याची मदत घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महानंदाद्वारे अधिकाधिक दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech