धावपटू फौजा सिंग यांच्या हिट अँड रन मृत्यू प्रकरणात एनआरआयला अटक

0

चंदिगढ : प्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचा हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी एका ३० वर्षीय एनआरआयला अटक केली आहे. एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लन यांना अटक करण्यासोबतच पोलिसांनी फॉर्च्युनर एसयूव्ही जप्त केली आहे.जालंधरमधील करतारपूर येथील दासुपूर गावातील रहिवासी ढिल्लन याला मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. आणि भोगपूर पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारघटनेनंतर अधिकाऱ्यांनी संशयास्पद वाहनांची यादी तयार केली होती. मंगळवारी संध्याकाळी उशिरा अधिकाऱ्यांनी एक फॉर्च्युनर एसयूव्ही ओळखली. प्राथमिक तपासात असेही दिसून आले की, हे वाहन कपूरथळामधील रहिवासी वरिंदर सिंग यांच्या नावावर नोंदणीकृत होते.जालंधर पोलिसांचे पथक ताबडतोब कपूरथळा येथे पोहोचले आणि वरिंदर सिंगची चौकशी केली. चौकशीदरम्यान वरिंदरने सांगितले की, त्याने ही कार दोन वर्षांपूर्वी अमृतपाल सिंग ढिल्लन नावाच्या एका एनआरआयला विकली होती. जोनुकताच कॅनडाहून परतला होता.

सरदार फौजा सिंग हे एक ब्रिटिश मॅरेथॉन धावक होते. जे सुमारे ११४ वर्षे जगले. त्यांचे मूळ गाव बियास आहे. ते जालंधर ग्रामीण जिल्ह्यात येते. सोमवारी दुपारी ३:०० वाजता जेवणानंतर सरदार फौजा सिंग रस्त्यावर फिरायला गेले… तिथे जालंधर आणि पठाणकोट दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरएका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.त्यांना जालंधर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. आदमपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकतपास सुरू आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech