‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत २८ आणि २९ जुलैला होणार चर्चा

0

मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर २८ आणि २९ जुलै असे दोन दिवस चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यात सोमवारी लोकसभेत आणि त्यानंतर मंगळवारी राज्यसभेत चर्चा होईल. या चर्चेसाठी सरकारने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना प्रत्येकी 16 तासांचा वेळ दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी चर्चेत सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारने चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला असला तरी, विरोधकांनी उद्यापासूनच चर्चा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचे कारण देत सरकारने ही मागणी फेटाळली.

गेल्या आठवड्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी वाढताना पाहायला मिळत होती. ज्यामध्ये विरोधी पक्षाच्या खासदार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि बिहारमधील स्पेशल इन्टेन्शिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्सवर उत्तरे देण्याची मागणी केली होती. तसेच विरोधकांनी वेगवेगळ्या नियमांच्या अंतर्गत विविध प्रश्नांवर कमी कालावधीच्या चर्चा घेण्याचीही मागणी केली आहे. तसेच नियमित चर्चेसाठी कामकाज सल्लागार समितीची दर आठवड्याला बैठक घेण्याची मागणीही केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech