भाजपा गटनेते प्रविण दरेकरांच्या निधीतून केलेल्या विकासकामांचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण

0

मुंबई :  भाजपा गटनेते आमदा प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून सकरण्यात आलेल्या मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे. आ. दरेकर यांच्या विकास निधीतून मागाठाणे विधानसभेतील शिवाजीनगर हनुमान टेकडी बोरिवली (पूर्व) येथे समाजकल्याण केंद्र, अष्टविनायक मित्र मंडळ, काजूपाडा येथे समाजकल्याण केंद्र व कार्यालय, अभिनव नगर बोरिवली (पूर्व) येथे ऍम्फीथिएटर व ओधवनगर आणि रहेजा सोसायटी, कुलूपवाडी, बोरिवली (पूर्व) येथे उद्याने टायर करण्यात आली असून त्याचे लोकार्पण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आ. अतुल भातखळकर, आ. संजय उपाध्याय, आ. योगेश सागर, आ. मनीषा चौधरी, माजी आमदार विजय गिरकर, शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे, भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दीपक तावडे, भाजपा मुंबई प्रदेश सरचिटणीस गणेश खणकर यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती निमंत्रक व मागाठाणे उत्तर विधानसभेचे मंडल अध्यक्ष अमित उतेकर, मागाठाणे मध्य विधानसभेच्या मंडल अध्यक्षा सोनाली नखुरे यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech