पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात ११ व्या दहशतवाद्याला बेड्या

0

पुणे : इप्रूव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) म्हणजे बॉम्ब बनविण्याचे व गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण देणार्‍या इसिसच्या आणखी एका दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेड्या ठोकल्या. पुणे मॉड्यूल प्रकरणातील तो एक मुख्य आरोपी असल्याचे व त्याच्याविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. या दहशतवाद्याच्या अटकेमुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. रिझवान अली ऊर्फ अबू सलमा ऊर्फ मौला असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. या गुन्ह्यातील अटक केलेला अकरावा आरोपी ठरला आहे.

तर, या प्रकरणात आत्तापर्यंत मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सीमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामिल नाचन, अकीफ नाचन, शहनवाज आलम, अब्दुल्ला फैयाज शेख, तल्हा खान यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या तपासात उघड झाल्याप्रमाणे रिझवान अली हा इसिसच्या भारतातील कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech