भुवनेश्वर : भगवान जगन्नाथ यांच्या ‘बहुदा’ यात्रेला किंवा परतीच्या रथोत्सवाला औपचारिक ‘पहाडी’ विधीने सुरुवात झाली. ज्यामध्ये श्री गुंडीचा मंदिरापासून सारधाबली येथे उभ्या असलेल्या रथांपर्यंत मूर्तींची औपचारिक मिरवणूक काढण्यात आली. बहुदा यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ‘पहाडी’ विधी दुपारी १२ वाजता सुरू होणार होता. पण तो सकाळी १०.३० वाजता सुरू झाला. त्रिमूर्ती – भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांना एक-एक करून रथांवर नेण्यात आले. भव्य रथ, तलध्वज, दर्पदलन आणि नंदीघोष हे श्री गुंडीचा दिरापासून १२ व्या शतकातील मंदिर सुमारे २.६ किमी अंतरावर असलेल्या भगवान जगन्नाथाच्या मुख्य ठिकाणी भाविक ओढतात.
भगवान जगन्नाथाची रथयात्रा २७ जून रोजी सुरू झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी २९ जूनला गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू आणि सुमारे ५० लोक जखमी झाले होते. ही चेंगराचेंगरी लक्षात घेऊन बहुदा यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि ओडिशा विधानसभेतील विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी बहुदा यात्रेच्या शुभ मुहूर्तावर नागिरकांना शुभेच्छा दिल्या.