आगामी १५ ऑगस्टनंतर होणार आयोजन
पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये आयोजित मतदार हक्क यात्रा तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. राजदचे प्रदेश सरचिटणीस रणविजय साहू यांनी अपरिहार्य कारणांमुळे यात्रा पुढे ढकलल्याची माहिती देणारे पत्र जारी केले आहे. आगामी कार्यक्रमाची माहिती वेळेत जाहीर केली जाईल असे साहू म्हणाले पहिल्या टप्प्यात १० ते २० ऑगस्ट दरम्यानया यात्रेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात बिहारच्या ११ जिल्ह्यांचा समावेश होता. ही यात्रा १० ऑगस्ट रोजी सासाराम येथून सुरू होणार होती.
या यात्रेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह घटक पक्षांचे इतर नेते सहभागी होणार होते. मात्र, राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या ‘मतदार हक्क यात्रे’ची गती सध्यासाठी थांबली आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची ही संयुक्त यात्रा आता १० ऑगस्ट ऐवजी १५ ऑगस्टनंतर सुरू होईल. राजदने अधिकृतपणे याची पुष्टी केली आणि नवीन तारखा आणि वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे सांगितले.