नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरामुळे बाधित जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आणि केंद्र सरकारकडून या राज्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि हजारो नागरिक अडचणीत आहेत. राहुल गांधींनी केंद्र सरकारकडून या राज्यांसाठी तात्काळ विशेष मदत पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पुरामुळे खूप वाईट परिस्थिती आहे. नागरिकांना वाचवणे ही सरकारची जबाबदारी आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या राज्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याचे तसेच मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे आवाहन केले आहे. अशा कठीण काळात केंद्र सरकारची सक्रिय भूमिका आणि पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे.