नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधी घाबरले आहेत” असं म्हणत निशाणा साधला. विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर आठवले यांनी “काँग्रेस सरकारच्या काळातही असं घडत होतं. आम्ही आंदोलन करायचो” असं म्हटलं आहे.
“मला वाटतं की, राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात. म्हणूनच ते प्रत्येक निवडणुकीत पराभूत होत आहेत. जर निवडणूक आयोग त्यांना बोलावत असेल तर त्यांनी जावं. जर काही घोटाळा झाला असेल तर त्यांना तिथे जाण्याचा अधिकार आहे. पण राहुल गांधी तिथे जात नाहीत. निवडणूक आयोग तुम्हाला वारंवार येण्यास सांगत आहे. पण निवडणूक आयोगाविरुद्ध रॅली काढण्यात काही अर्थ नाही. विरोधकांकडे दुसरा कोणताही विषय नाही. म्हणूनच ते वारंवार असे चुकीचे मुद्दे उपस्थित करत आहेत.”