दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष
मुंबई : राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. भाजपा कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही मात्र मविआ आणि आता नवा भिडू राज ठाकरे हे जाती, धर्म, समाजांमध्ये भेदभाव करत असून त्यांना आम्ही उघडे पाडणार असा इशाराही ॲड. शेलार यांनी यावेळी दिला. यावेळी ॲड. शेलार यांनी ८ वर्गीकरणातील याद्यांमधील मतदारांची नावे सादर करीत मविआ आणि राज ठाकरे यांच्या असत्यकथनाचा पर्दाफाश केला. अनेक आमदारांच्या मतदारसंघांतील मुस्लीम दुबार मतदारांची संख्या आणि मविआ आमदारांचे मताधिक्य याची तुलना करीत अनेक मविआ आमदारांचा विजय या मुस्लीम दुबार मतदारांमुळेच झाला असे म्हणायचे का असे म्हणत त्यांनी राज ठाकरे, मविआला लक्ष्य केले.
भाजपाची भूमिका ही नेहमीच ‘सर्वांना न्याय, पण कुणाचेही तुष्टीकरण नाही’ अशी आहे असेही त्यांनी नमूद केले. जे कोणी दुबार मतदार दिसतील त्यांना फोडून टाकण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का? असा सवालही त्यांनी केला.ॲड. शेलार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चामध्ये निव्वळ असत्यकथन करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना ‘जोर का झटका’ लागल्याने दिल्लीतील पप्पू ते गल्लीतील पप्पू पर्यंत सर्वांनी मतचोरीच्या फेक नरेटिव्हची बांधणी करत रान उठवण्यास सुरुवात केली. त्याचाच पुढचा अंक आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विरोधक खोट्या माहितीच्या आधारे रंगवण्य़ाचा प्रयत्न करत आहेत. मतचोरीचा खोटा गळा काढून मविआने केलेला खरा घोटाळा दाबला जात आहे.
मविआच्या गडबडीची उदाहरणे दाखवाच या मविआच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाही आणि कदापि देणार नाही मात्र उघड्या डोळ्यांनी दिसणारे वास्तव समोर मांडत आहोत असे शेलार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत मविआने सुनियोजित ‘व्होट जिहाद’ करत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली होती. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी खेळ केला होता अशीही टीकेची झोड ॲड. शेलार यांनी उठवली.
कर्जत – जामखेड, लातूर, माळशिरस, धारावी, मुंबादेवी आदी ३१ मतदारसंघांत दुबार मुस्लीम मतदार ३१ विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणानंतर २ लाख २५ हजार ७९१ मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांची संख्या समोर आली असून सर्व २८८ मदारसंघातील हाच आकडा १६ लाख ८४ हजार २५६ वर जाऊ शकेल असेही ते म्हणाले. ह्या आकड्यात मविआच्या समर्थकांचा समावेश नाही असेही त्यांनी नमूद केले. मविआ नेते ही नावे का घेत नाहीत असा परखड सवाल करत ॲड. शेलार यांनी त्या मतदारसंघांची यादीच सादर केली. रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात: मुस्लिम दुबार मतदार ५५३२ (१२४३मतांनी विजय) : नाना पटोलेंच्या साकोली विधानसभा मतदारसंघात :मुस्लीमांची दुबार मते ४७७ (२०८ मतांनी विजय), वरुण सरदेसांईंच्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात :१३,३१३ हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार (११,३६५ मतांनी विजय ), बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर ५३२४ मतांनी विजयी झाले , तिथे १४,९४४ दुबार मुस्लिम मते आहेत.
जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघात : दुबार मुस्लिम मते ३०,६०१, उत्तम जानकरांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात : दुबार मुस्लिम मते, ४३९९ राजेश टोपेंच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात: दुबार मुस्लिम मते ११,७५. (केवळ २३०९ मतांनी शिवसेना विजयी) अमित देशमुखांच्या लातूर शहर मतदारसंघात : २०,६१३ दुबार मुस्लिम मते, ती गायकवाडांच्या धारावी मध्ये : १०,६८९ दुबार मुस्लिम मते, अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मध्ये : ११,१२६ दुबार मुस्लिम मते, नितीन राऊतांच्या उत्तर नागपूर मध्ये : ८३४२ दुबार मुस्लिम मते, अस्लम शेख यांच्या मालाड पश्चिम मध्ये : १७,००७ दुबार मुस्लिम मते (६२२७ मतांनी विजय)., राहुल पाटील यांच्या परभणी मध्ये : १३,३१३ दुबार मुस्लिम मते, सुनील राऊतांच्या विक्रोळीत : ३४५० दुबार मुस्लिम मते., संजय पोतनीसांच्या कलिना मध्ये : ६९७३ दुबार मुस्लिम मते(५००८ मतांनी विजय ) अनंत नर यांच्या जोगेश्वरी पूर्व मध्ये : ६४४१ दुबार मुस्लिम मते(१५४१मतांनी विजय ) नितीन देशमुखांच्या बाळापूर मध्ये : ५२५१ दुबार मुस्लिम मते, सुनील प्रभूंच्या दिंडोशीत : ५३४७ दुबार मुस्लिम मते(६१८२ मतांनी विजय) कैलास पाटील यांच्या धाराशिवमध्ये : ११,२४२ दुबार मुस्लिम मते एकच फोटो वापरुन केवळ नावे बदलण्यात आली. असे मोठे घोटाळे महाविकास आघाडीने केले आहेत.
कर्जत-जामखेड – शबनम शेख : अनुक्रमांक ७४२ मध्ये आणि ७४३ मध्येही. रूबिना शेख : अनुक्रमांक १२६८ मध्ये आणि १२६४ मध्येही साजिद शेख : अनुक्रमांक ३२१ मध्ये आणि ३२३ मध्येही आयशा आतार : अनु. २३५ मध्ये आणि २३६ मध्येही रेयान रईस कुरेशी : अनु. १२८५ मध्ये आणि १३३२ मध्येही.अफसाना पठाण : अनु. ३६० आणि १०५८ मध्येही. बांद्रे पूर्व :मुमताज बानो अन्सारी दोन ठिकाणे नावे. अनुक्रमांक १०१२ आणि ४३७ विधानसभा झाल्यावर हे नाव डिलिट झाले.