नवी दिल्ली : युपीएच्या तुलतेने भाजप सरकारच्या शासन काळात गेल्या ११ वर्षात किरकोळ महागाई दरात सरासरी ३ टक्क्यांची घट झाली. युपीएच्या कार्यकाळात महागाई दर ८.१ टक्के होता. तर भाजपच्या कार्यकाळात ५.१ नोंदवल्या गेला. जून २०२५ मध्ये किरकोळ महागाई २.१ टक्क्यांवर आली आहे. यूपीएच्या कार्यकाळात, जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१४ या २८ महिन्यांपैकी २२ महिन्यांत महागाई दर ९ टक्क्यांहून अधिक होताअधिकृत आकडेवारीनुसार, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या कार्यकाळात, जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१४ या २८ महिन्यांपैकी २२ महिन्यांत महागाई दर ९ टक्क्यांहून अधिक होता. यूपीएच्या कार्यकाळातील शेवटच्या तीन वर्षांत, देशातील किरकोळ महागाई दर सरासरी ९.८ टक्के होता, तर त्यावेळी जागतिक महागाई ४-५ टक्क्यांच्या दरम्यान होती.
देशात जून २०२५ मध्ये किरकोळ महागाई २.१ टक्क्यांवर आली आहे त्याच वेळी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, किरकोळ महागाई दर बहुतेक वेळा ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे आणि महागाई कधीही ८ टक्क्यांच्या पातळी ओलांडली नाही. जून २०२५ मध्ये किरकोळ महागाई २.१ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत त्यात ०.७२ टक्क्यांची घट झाली आहे. मे महिन्यात ती २.८२ टक्के होती.आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात ग्रामीण पातळीवर किरकोळ महागाई दर १.७२ टक्के होता, तर शहरी पातळीवर किरकोळ महागाई दर २.५६ टक्के होता. जून २०२५ मध्ये नोंदवलेला किरकोळ महागाई दर जानेवारी २०१९ नंतर किरकोळ महागाईचा सर्वात कमी आकडा आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात ग्रामीण पातळीवर किरकोळ महागाई दर १.७२ टक्के होता, तर शहरी पातळीवर किरकोळ महागाई दर २.५६ टक्के होता.
आरबीआयने २०२५-२६ साठीचा महागाईचा अंदाज ४ टक्क्यांवरून ३.७ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.या महिन्यात महागाईत झालेली मोठी घट प्रामुख्याने भाज्या, डाळी, मांस आणि मसाल्यांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे झाली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अलीकडेच सांगितले की, आरबीआयने २०२५-२६ साठीचा महागाईचा अंदाज ४ टक्क्यांवरून ३.७ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई दर आता ३.७ टक्के असा अंदाज आहे, ज्यामध्ये पहिल्या तिमाहीत २.९ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ३.४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ३.९ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.४ टक्के चलनवाढीचा अंदाज आहे.