एनडीएच्या ठरावाचे एस. जयशंकर यांच्याकडून स्वागत

0

भारताच्या दहशतवादाविरोधातील ठाम भूमिकेची पुनःपुष्टी

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) संसदीय पक्षाच्या ठरावाचे स्वागत केले. या ठरावात भारताच्या शांततेच्या वचनबद्धतेची आणि दहशतवादाविरोधातील शून्य सहनशीलतेच्या धोरणाची पुन्हा एकदा ठामपणे पुनःपुष्टी करण्यात आली. एनडीए संसदीय पक्षाच्या या ठरावात ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’सारख्या महत्वाच्या मोहिमेदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि बलिदानाचे गौरव करण्यात आले.

यावेळी दहशतवाद्यांवर भारताने दिलेले प्रत्युत्तर, अणु ब्लॅकमेलच्या कोणत्याही प्रकाराला न झुकणारी भूमिका, तसेच भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी असलेला कटिबद्ध दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला. यासंदर्भातील ट्विटर (एक्स) संदेशात जयशंकर म्हणाले की, एनडीए संसदीय पक्षाचा आज स्वीकारण्यात आलेला ठराव हा शांततेच्या वचनबद्धतेची आणि दहशतवादाविरोधातील शून्य सहनशीलतेची ठाम आणि ठोस पुनःपुष्टी आहे. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवमधील आमच्या सशस्त्र दलांच्या शौर्याचे हे साक्षीदार आहे.

एनडीएच्या या ठरावात ३ प्रमुख भूमिका नमूद केल्या आहेत त्यानुसार भारतावर होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला आपल्या अटींवर योग्य उत्तर दिले जाईल. अणु बॉम्बच्या नावाखाली कोणतेही ब्लॅकमेलींग सहन केली जाणार नाही. दहशतवादाला मदत करणाऱ्या सरकार आणि मास्टरमाइंड यांच्यात फरक केला जाणार नाही. एनडीए संसदीय पक्षाची ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजप, टीडीपी, जेडीयू आणि अन्य घटक पक्षांच्या खासदारांनी सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि सरकारच्या ठोस धोरणांचे कौतुक केले.

ठरावात “पाहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना आमच्या सखोल संवेदना आणि श्रद्धांजली” अर्पण करण्यात आली. ऑपरेशन सिंदूर: दहशतवाद्यांवर ठोस कारवाई पाकिस्तानातील लश्कर-ए-तोयबाची शाखा असलेली जिहादी दहशतवादी संघटना ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने (टीआरएफ) जम्मू आणि काश्मीरमधील पाहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी अत्यंत भीषण हल्ला केला. या नृशंस हल्ल्यात 26 निष्पाप हिंदू पर्यटकांची निर्दयी हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर भारताने ६ व ७ मे दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर अचूक आणि प्रभावी हल्ले करण्यात आले. हे अभियान युद्ध न छेडता पार पडलं, पण भारताची कठोर भूमिका जगापुढे ठसवून सांगितली.

ठरावात नमूद करण्यात आले आहे की, २०२४ नंतर एनडीए सरकारच्या कारकिर्दीत भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका अधिक स्पष्ट आणि आक्रमक झाली आहे. त्याआधी देशभर स्फोटांची मालिका सामान्य बाब होती. मात्र आज, भारत जागतिक स्तरावर शांततेच्या बाजूने उभा राहत असला, तरी त्याच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड करत नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech