मुंबई : एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने भारतात आपली सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. लवकरच कंपनी भारतात ही सेवा सुरू करू शकते. एलन मस्क यांच्या कंपनीला सध्या दूरसंचार विभागाकडून व्यावसायिक लॉन्चिंगसाठी मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, कंपनी आजपासून (३० आणि ३१ ऑक्टोबर) मुंबईत टेक्निकल आणि सिक्युरिटी डेमो रन आयोजित करत आहे. या डेमो रनदरम्यान कंपनी आपले हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्क किती सक्षम आहे हे दाखवणार आहे.
स्टारलिंक कंपनीने भारतात आपली अधिकृत उपस्थिती नोंदवली आहे. कंपनीने मुंबईतील चांदिवली परिसरात पुढील पाच वर्षांसाठी ऑफिसची जागा भाडेतत्त्वावर घेतले आहे. कंपनी भारतातील नऊ शहरांमध्ये आपले बेस स्टेशन उभारणार आहे. ज्यामध्ये मुंबईव्यतिरिक्त नोएडा (दिल्लीजवळ), चंदीगड, आणि कोलकाता यांसारखी शहरे समाविष्ट आहेत.रिपोर्टनुसार, एलन मस्क यांच्या कंपनीने मुंबईतील चांदिवली भागात १,२९४ चौरस फूट ऑफिस स्पेस पाच वर्षांसाठी २.३३ कोटी रुपयांच्या भाड्याने लीजवर घेतले आहे. भारतात ही स्टारलिंकची पहिली अधिकृत उपस्थिती मानली जात आहे.
याशिवाय कंपनी आजपासून (३० आणि ३१ ऑक्टोबर) मुंबईत टेक्निकल आणि सिक्युरिटी डेमो रन आयोजित करत आहे. या डेमो रनदरम्यान कंपनी आपले हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्क किती सक्षम आहे हे दाखवणार आहे. या ट्रायलद्वारे स्टारलिंक भारतातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवत आहे. या सेवेमुळे देशातील दुर्गम आणि मागास भागांपर्यंतही ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचेल. ट्रायलनंतर भारतात स्टारलिंकच्या व्यावसायिक लॉन्चिंगची रूपरेषा निश्चित केली जाऊ शकते. कंपनीला सध्या भारतात इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी सरकारी मंजुरी आणि स्पेक्ट्रम क्लिअरन्सची प्रतीक्षा आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्टारलिंकच्या प्रवेशामुळे भारतातील सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर वापरकर्ते मोबाइल नेटवर्कशिवायही हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील. ही सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा विशेषतः त्या भागांसाठी उपयुक्त ठरेल, जिथे मोबाइल टॉवर उभारणे अशक्य आहे. स्टारलिंकव्यतिरिक्त जिओ आणि एअरटेल या कंपन्याही भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तसेच अमेझॉन देखील आपल्या कुईपर सॅटेलाइट इंटरनेट सर्विससाठी भारतात तयारी करत आहे