चेन्नई : तमिळनाडूच्या चिदंबरममध्ये रेल्वे आणि स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी आहेत.हा अपघात मंगळवारी(दि.८) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडला.अपघातानंतर स्कूल बसची परिस्थीती पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेम्मानगुप्पम भागात शाळेची बस मुलांना घेऊन जात होती. रेल्वे ट्रॅक पार करत असताना ट्रेनची या बसला टक्कर बसली. विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस उडून रेल्वे ट्रॅकच्या बाजुला असलेल्या झुडुपात पडली.
सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात स्कूल बसच्या चिंधड्या उडाल्या आहेत. आतापर्यंत दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. इतर विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कुडड्लोर सरकारी हॉस्पिटलमद्ये नेण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने या भीषण अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले. शिवाय या ठिकाणी मदत आणि बचाव करणारी पथकंही पोहचली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं आहे. या घटनेत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.