छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार संजय केणेकर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला प्राधान्याने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व म्हणजे शासनव्यवस्थेतील प्रत्येक स्तराचे सखोल ज्ञान, विविध घटकांचे प्रश्न समजून घेण्याची संवेदनशीलता आणि त्यावर समाधानकारक निर्णय घेण्याची स्पष्ट इच्छाशक्ती! शासन आणि जनता यांच्यामधला संवाद अधिक सुस्पष्ट आणि परिणामकारक व्हावा, यासाठी कटिबद्ध नेतृत्वकर्त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य हक्कासाठीची राज्य शासनाकडे आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचं आमदार केणेकर यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्ष हा समाजातील प्रत्येक घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.