छत्रपती संभाजीनगर : “मी शेतकऱ्यांना धीर द्यायला आलो आहे. कुणीही अस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका. हे माझं तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे. असा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर ते आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी संकटात सापडला आहे. आम्ही सरकारकडून जी मदत तातडीने हवी आहे ती आम्ही मिळवून देऊ. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत केली जावी आणि कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी आम्हीही आग्रही राहू. तातडीची मदत सरकारला देऊ द्या त्यानंतर बाकीच्या गोष्टीही आपण पाहू. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचीही मागणी आम्ही करणार आहोत.” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरेंनी लातूरच्या काटगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते.
उद्धव ठाकरे यांनी लातूरमधल्या काटगाव या ठिकाणी गेले होते. तिथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट उद्धव ठाकरेंनी घेतलं. पिकांची पाहणीही उद्धव ठाकरेंनी केली. एका दिवसात उद्धव ठाकरे पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यातले जिल्हे त्याचप्रमाणे सोलापूर या ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना स्थलांतरित करावं लागलं आहे. यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्रातील नेते तसेच काँग्रेसचे नेते उपस्थित होते.