उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, बचावकार्य सुरु

0

देहरादून : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग- बद्रीनाथ महामार्गावरील घोलतीर येथे आज(दि.२६) सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.या अपघातात आतापर्यंत मध्ये ५ ते ७ प्रवाशांना वाचवण्यात आले असून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर अद्याप १० जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या अपघाताबाबत माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले की, अपघातग्रस्त वाहन हे टेम्पो ट्रॅव्हलर असण्याची शक्यता आहे. ही गाडी प्रवाशांना घेऊन जात होती.

या गाडीमधून १८ ते २० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून, आता पर्यंत पाच ते सात प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागला आहे.यात जखमी झालेल्यांमध्ये ९ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश असून, अपघातग्रस्त वाहनामधील १० जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यास अडथळा येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech