विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी दाखल केला अर्ज

0

नवी दिल्ली : इंडी आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी (२१ ऑगस्ट) आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे आणि संजय राऊत यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुदर्शन रेड्डी यांचा सामना एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी होणार आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी दिलेल्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक होत आहे. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. २१ ऑगस्ट ही नामांकन भरण्याची अंतिम तारीख आहे, तर २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार असून, त्याच दिवशी मतमोजणीदेखील होईल. बी. सुदर्शन रेड्डी हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच गोव्याचे पहिले लोकायुक्त देखील राहिले आहेत. ते आंध्र प्रदेशचे रहिवासी असून, त्यांची २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. यावेळीची उपराष्ट्रपती निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे, कारण ही लढत “दक्षिण भारत विरुद्ध दक्षिण भारत” अशा स्वरूपात झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech