दिवाळी पूर्वी आधी बल्याणी परिसरात १ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचा धडाका

0

माजी नगरसेवक मयुर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


(दत्ता भाटे )

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ग्रामीण अ प्रभागक्षेत्रातील बल्याणी प्रभागात माजी नगरसेवक मयुर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दिवाळीआधी बल्याणी परिसरात १ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचा धडाका उडाला आहे. बल्याणी प्रभागाच्या विकासाठी मुलभूत, पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि नेहमीच प्रशासनाकडे पाठपुरावा करून निधीची तरतूद करून प्रश्न मार्गी लावण्यात माजी नगरसेवक मयूर पाटील, माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात. त्याच अनुषंगाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रभागातील मुलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तब्बल १ कोटी ६० लाखांचा निधी प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपलब्ध केला. या विकास कामांचा शुभारंभ माजी नगरसेवक मयुर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्याहस्ते रविवारी करण्यात आला. यामध्ये बल्याणी उंभार्णी बौद्धवाडा येथे अंतर्गत गटार व पायवाट तयार करणे, बल्याणी आदिवासी पाडा येथे सिसी रस्ता व गटार व पायवाट तयार करणे, बल्याणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील गटार व पायवाट तयार करणे या विकास कामांचा समावेश आहे.

या प्रसंगी मयूर पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण अविकसित प्रभागाचा कायापालट होण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. त्या अनुषंगाने बल्याणीतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे. बल्याणी आदिवासी पाडा, उभारणी बौद्ध वाडा, मुस्लिम वस्ती इत्यादी ठिकाणी रस्ता व गटारे कामासाठी १ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आशिर्वाद आणि माजी नगरसेविका नमिता पाटील, आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झाला आहे. समाजातील सर्वच घटकाच्या सोयी सुविधांसाठी आपण काम करीत असून प्रशासनाकडून भांडून निधी आणणे कर्तव्य आहे.

या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक मयुर पाटील, माजी नगरसेविका नमिता पाटील, उघोजक राजु पाटील, कृष्ण दळवी, आरफत गुजर, महेश पाटील, अनंता पाटील, एकनाथ पवार, हेमंत गायकवाड, संदिप गायकवाड, शिवाजी गोंधळे, सुरज पावशे यासह स्थानिक नागरिक, माहिला आघाडी, युवा सैनिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech