अंबरनाथ : अंबरनाथ शहरातमध्ये अंबरनाथ आर्ट सर्कल आणि अंबरनाथ संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शास्त्रीय गायनाचा सुरेल कार्यक्रम रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अंबरनाथ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रीय गायिका सौ. अंगिरा कोटल यांनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांना सुरांच्या अद्भुत प्रवासात नेले. त्यांना स्वरसंवादात साथ लाभली अनंत जोशी (हार्मोनियम), संकेत ओक (तबला) यांची तर या सांस्कृतिक सोहळ्यास अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सांस्कृतिक विकास करणारे साहित्यिक वारसा पूढ़े नेणारे सुनील चौधरी यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमास शोभा आणली यावेळी बोलतांना चौधरी यांनी सांगितले की, डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अंबरनाथ मधे भव्य नाट्यगृह वास्तवाच्या उंबरठ्यावर आले आहे. हे अंबरनाथकरांसाठी हे संस्कृतीला समर्पित आणि अभिमानाचे व्यासपीठ ठरणार आहे.
यावेळी बोलतांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कलाक्षेत्रातील भक्कम पाठिंबा आणि दूरदर्शी उपक्रमांसाठी मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच त्यांनी सांगितले की अंबरनाथ संगीत सभा सारख्या कलाविकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना अल्प दरात नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवतील. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांच्या दूरदर्शी नेतृत्वातून उभे राहणारे हे नाट्यगृह अंबरनाथकरांसाठी संस्कृतीचे हक्काचे व्यासपीठ ठरणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ वसंत महाजन, अध्यक्ष प्रसाद मूडवड़ेक्कर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
अंबरनाथ संगीत सभा ही गत ४० वर्षांपासून अंबरनाथ शहरातील सांस्कृतिक आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वसंत महाजन यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि अध्यक्ष प्रसाद मूडवडेक्कर यांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळे संस्थेने शहराच्या सांस्कृतिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे.