अंबरनाथ : अंबरनाथ केमिस्ट असोसिएशन तर्फे आयोजित केलेले मार्गदर्शन शिबिर व दिवाळी संमेलन आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून औषध निरीक्षक (D.I.) संजय राठोड साहेब आणि माजी औषध निरीक्षक (D.I.) ॲडव्होकेट विवेक चौधरी साहेब यांनी केमिस्ट बांधवांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय या शिबिरात अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तसेच माजी केमिस्ट असोसिएशनचे चेरमैन सुनील चौधरी साहेब यानी संघटित रहा आम्ही आपल्या सोबत आहोत आवाहन केले. तर डॉ. पाल यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल अंबरनाथ केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय जुमानी यांनी त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात अंबरनाथ केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय जुमानी यांच्या हस्ते आलेल्या केमिस्ट बांधवांना दिवाळी भेटवस्तू देण्यात आली आणि त्यांनी सर्व केमिस्ट बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किनीकर यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अंबरनाथ केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय जुमानी यांनी आभार व्यक्त करण्यात आले.