केडीएमसीच्या यंदाच्या निवडणुकीत

0

मागील दहा वर्षा पूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेने अंदाजे पावणे दोन लाख मतदार वाढले….

महिलांची मतदार वाढीची सख्या रोडावली …दहा हजार मतदार वाढ संख्या पोहचू शकली नाही.

कल्याण ( सतीश तांबे) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची यंदाच्या पालिका निवडणूक मागील दहा वर्षा पूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेने केवळ एक लाख ७३ हजार ८७४ मतदार वाढल्याने वाढीव मतदार संख्या १२.२० टक्के इतकी आहे. या मध्ये वाढलेल्या मतदानात महिला मतदाराची सख्या धक्कादायक असून महिलांची वाढीव मतदार सख्या दहा हजार संख्येचा आकडा गाठू शकला नाही ही बाब चिंतेची आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक पालिका निवडणुकीचा कालावधी नोव्हेंबर २०२० साली संपुष्ठात आल्या नंतर सहावी पालिका पाच वार्षिक पालिका निवडणूका कोरोनाच्या संसर्ग मुळे पुढे ढकलण्यात आली व शासनाने पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू केली.कोरोनाचा संसर्ग ओसरल्यावर आता निवडणुका घेतल्या जातील उद्या निवडणुका घेतल्या जातील या आशेवर निवडणुकीला उभे राहणारे इच्युक पाण्यात देव बुडवून ठेवले होते .शासनाने राज्यातील कालावधी संपुष्टात आलेल्या सर्वच महापालिकाबरखास्त केल्याने अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने तब्बल दहा वर्षाच्या कालावधी नंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूका होणार आहेत.

पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतर पालिकेच्या निवडणूक विभागाने गुरुवारी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली .या मतदार यादीत मागील दहा वर्षा पूर्वी झालेल्या २०१५ सालच्या पालिका निवडणुकीच्या वेळी एकूण लोक सख्या १५ लाख १८ हजार ७६२ होती या मध्ये पुरुष मतदार ५ लाख ८१ हजार ९१६ तर महिला मतदार ६ लाख ६८ हजार ७३० असे एकूण १२ लाख ५० हजार ६४६ मतदार होते निवडणुकीत ३ लाख १६ हजार ६३८ पुरुष मतदारांनी तर २ लाख ५४ हजार ८४० महिला मतदार अश्या एकूण ५ लाख ७१ हजार ४६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित ४५.६९ टक्के मतदान झाले होते. मागील दहा वर्षा पूर्वीच्या २०१५ सालच्या निवडणुकीच्या तुलनेने पालिका क्षेत्रातील निवडणुकीसाठी एकूण लोक संख्या १५ लाख १८ हजार ७६३ इतकी असून १४ लाख २४ हजार ५२० एकूण मतदार संख्या आहे.या मध्ये पुरुष मतदार ७ लाख ४५ हजार ३९२ तर महिला मतदार ६ लाख ७८ हजार ५७६ व इतर ५५२ मतदारांचा समावेश आहे .

मागील निवडणुकीच्या तुलनेने
यंदाच्या निवडणुकीत १ लाख ७३ हजार ८७४ मतदार वाढले असून या मध्ये १ लाख ६३ हजार ४७६ पुरुष तर ९ हजार ३९८ मतदारांची संख्या आहे .या वाढीव मतदार संख्येत मागील निवडणुकी पेक्षा एकूण २१ .४३ टक्क्यांनी मतदाराची वाढ झाली पुरुष मतदारांची १२.२० टक्क्यांनी वाढ झाली तर महिला मतदारांची १.४५ टक्के वाढ झाली ही नगण्य असून या पालिका निवडणुकीत महिला मतदारांनी अनुत्सुकता दाखवित पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या १२२ जागा साठी घेतल्या जाणाऱ्या चार सदस्यांचे २९ प्रभाग व तीन सदस्यांचे दोन प्रभाग अश्या ३१ प्रभगा मध्ये सर्वात जास्त मतदार असलेला प्रभाग क्र.३१ मध्ये ६७ हजार ३०१ मतदार असून यात पुरुष मतदार ३६ हजार ९३३ ,महिला मतदार ३० हजार ३६२ तर इतर ६ मतदार यांचा समावेश आहे तर सर्वात कमी मतदार असलेला प्रभाग क्रमांक.६ हा असून या प्रभागात एकूण २८ हजार ८७३ मतदार असून या मध्ये १५ हजार ६८ पुरुष मतदार ,१३ हजार ९०५ महिला मतदारांचा समावेश आहे.

*मतदार वाढीची कारणे
मतदार संख्या वाढीसाठी दरवर्षी राज्य शासनाच्या निवडणूक विभाग कडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात असतो.मुंबई ठाणे ,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली, उल्हासनगर,भिवंडी निजामपूर,वसई विरार,मीरा भाईंदर व पनवेल आदी शहरांचा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये समावेश असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी असल्याने देशभरातील परप्रांतीय नागरिकाचे लोंढेच्या लोंढे नोकरी व्यवसायासाठी या शहरात येत असून आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत असल्याने या परप्रांतीयांची सर्वच राजकीय पक्ष आपल्या राजकीय हेतूने आपल्या पक्षाची मतदार सख्या वाढण्यासाठी मतदार नाव नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबविले जात असतात ही मतदार वाढीची कारणे आहेत

* मतदार संख्या कमी होण्याची कारणे…
मुंबई ठाणे शहरात काम धंद्यासाठी जाणाऱ्या नोकरसदर वर्गाला कामाच्या व्यापातून मतदार नोंदणी करता येत नाही तर मतदार नोंदणीच्या सर्वांच्या वेळी घराला टाळे असल्याने मतदार नोंदणी यादी तून बाद केली जातात .काही मतदार भाड्याच्या घरात राहत असल्याने जुन्या राहण्याच्या घरावर काढलेले मतदान नाव नोंदणी कार्ड चा पत्ता बदलत नसल्याने मतदार तपासणी च्या वेळी मतदान नाव नोंदणी केलेल्या पत्त्यावर मतदार रहात नसल्याने त्याची नावे वगळली जात असतात ही मतदार संख्या कमी कारणे आहेत.त्यातच मागील विधान सभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार नावे यादीत असल्याने ही दुबार नावे मतदार यादी तून वगळण्याचे कामे सुरू असल्याने मतदार यादीतील नावे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा परिणाम यंदाच्या पालिका निवडणुकीतील मतदार यादीतील मतदार सख्या वाढीव संख्ये वरुण दिसून येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech