ऍसिडिटीच्या कॅप्सुल गोळ्यांमध्ये निघाल्या अळ्या

0

महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्क

कल्याण : कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऍसिडिटीच्या त्रासासाठी दिलेल्या गोळ्या घेताना त्या गोळ्यांमध्ये अळ्या असल्याचे समोर आल्यानंतर सायली पनवेलकर या महिला रुग्णासह संबंधित डॉक्टरही हादरले आहेत. सायली पनवेलकर यांनी ऍसिडिटीवर उपचारासाठी डॉ. केदार भिडे यांना भेट दिली होती. त्यांनी दिलेल्या औषधाच्या स्ट्रिपमधील एका गोळीमध्ये अळ्या दिसताच पनवेलकर यांचा थक्क उडाला. हा प्रकार पाहताच स्वतः डॉक्टरही अवाक झाले, अशा प्रकारची घटना प्रथम पाहिली असल्याची माहिती डॉ. भिडे यांनी दिली.

कल्याण पश्चिमेतील प्रथमेश इमारती राहणाऱ्या सायली पनवेलकर यांचा खांदा दुखत होता. त्यांची मुलगी मानसी राणे या त्यांच्या आई सायली यांना डॉक्टर केदार यांच्याकडे उपचारासाठी घेवून गेल्या. डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या. त्या गोळ्यामध्ये ऍसिडिटीवर ओमे कैप-२० ही गोळी देखील होती. सायली यांनी गोळ्या खाण्यासाठी घेतल्या. तेव्हा त्या गोळ्या काळपट असल्याचे दिसून आले. त्यांना थोडं वेगळं वाटलं. गोळ्या अशा का असा त्यांना संशय आला.

त्यांनी त्या गोळ्या निरखून पाहिल्या. त्यावेळी त्यांना त्या गोळ्यात आळ्या दिसून आल्या. हे पाहून सायली आणि त्यांची मुलगी मानसी यांना धक्का बसला. गोळ्यांच्याीपाकिटावर गोळ्यांची मॅन्युफॅक्चर डेट ही २०२५ सालची होती. त्या गोळ्यांची मुदत २०२७ साल पर्यंत असल्याचं ही त्यावर नमूद करण्यात आलं होतं. मुदत संपलेली नसताना गोळ्या काळपट आणि त्यात आळ्या कशा काय आढळून आल्या असा प्रश्न त्यांना पडला. हा प्रकार एखाद्या रुग्णांच्या जिविताशी खेळण्याचा आहे. त्यामुळे गोळ्यांच्या कंपनी विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सायली यांची मुलगी मानसी यांनी केली आहे.

मानसी यांनी आईसोबत डॉक्टर भिडे यांच्याकडे धाव घेतली. हा प्रकार ऐकताच डॉक्टर भिडे यांनाही धक्का बसला. असा प्रकार अन्य कोणा सोबत होऊ नये. यासाठी डॉक्टर भिडे यांनी तातडीने प्राईड हेल्थ केअरशी संपर्क साधला. त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यांना या बाबत पूर्ण कल्पना दिली. या प्रकरणी गोळ्यांची कंपनी रोनपोली यांच्याकडे संपर्क साधून घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला. त्यांना आळ्या आढळून आलेल्या गोळ्या पाठवून द्या. कंपनीने दाद दिली नाही तर या प्रकरणात ग्राहक न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल असे डॉक्टर भिडे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech