‘पक्का पता’: बदलापूर मध्ये पहिल्यांदाच आवाक्यातील घरे बांधण्याचा आनंद गोदरेज कॅपिटलने साजरा केला

0

बदलापूर : गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांची उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून ‘पक्का पता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू केली आहे. बदलापूर भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांचा भावनिक प्रवास ही मोहीम टिपते. तसेच भाड्याच्या जागेतून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्यासाठी गोदरेज हाऊसिंग फायनान्सला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून मान्यता देते.

या मोहिमेच्या केंद्रस्थानी एक साधा, सोपा पण सखोल दृष्टिकोन आहे: ‘पक्का पता’ म्हणजेच कायमस्वरूपी पत्ता, हे भारतीय कुटुंबांचे सर्वात मोठे स्वप्न असते. मुख्य विपणन अधिकारी नलिन जैन म्हणाले, “घर म्हणजे केवळ आर्थिक टप्पा नाही तर तो एक भावनिक टप्पा आहे. ‘ पक्का पता’ हा तो क्षण आहे, जेव्हा स्वप्नाचे सत्यात रूपांतर होते. भाड्याने घेतलेली जागा तुमची स्वतःची बनते आणि अनिश्चितता जाऊन अभिमान आणि स्थैर्याची भावना येते. सोपी कर्ज प्रक्रिया, एकूण घराच्या ९०% पर्यंत निधी आणि परतफेडीच्या दीर्घ मुदतीद्वारे आम्ही भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांमधील कुटुंबांसाठी घरमालकी अधिक सुलभ आणि तणावमुक्त बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”

महाराष्ट्रात पुण्यातील पिंपरी-चिंचवडसह, विरार, पनवेल, पुणे, जळगाव, नागपूर आणि नाशिक यासह टियर-२ बाजारपेठांमध्ये तसेच गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, वापी, गांधीधाम, हिंमतनगर, सुरेंद्रनगर, अंकलेश्वर आणि इतर अनेक शहरांमध्ये ही मोहीम राबवली जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech