ठाण्यातील इमारतीचा भाग कोसळला; १७ कुटुंबांचे स्थलांतर

0

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेटमधील किसननगर परिसरातील नंदादीप इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. पंचपरमेश्वर मंदिराजवळील नंदादीप या ५० वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तीन मजली असलेल्या नंदादीप इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग रात्री अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तात्काळ उपाययोजना करत १७ कुटुंबांना ‘हाजूरी रेंटल’ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच शेजारील दोन इमारतींतील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर प्रभाग समिती आणि बांधकाम विभाग यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू असून, अशा जुनाट आणि धोकादायक इमारतींच्या स्थितीकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, हे या प्रकारावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech