भोंडल्याच्या माध्यमातून शिवसेनेने महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती

0

 

शिवसेना कल्याण पूर्व महिला आघाडी शहरशाखेचे आयोजन

(दत्ता भाटे)

कल्याण : शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरु असून या योजनांची माहिती शिवसेनच्या वतीने भोंडल्याच्या माध्यमातून महिलांना देण्यात आली. शिवसेना कल्याण पूर्व महिला आघाडी शहरशाखेच्या वतीने महिलांसाठी महाभोंडला हळदी-कुंकू कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पूर्वेतील कशिश हॉटेल येथे करण्यात आले होते. कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला आघाडी जिल्हा प्रमुख छाया वाघमारे, शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी वैशाली लांडगे, मीना वाळेकर, मालती पवार, मनीषा भानुशाली, नेहा शेट्टी, अनिता लव्हटे, चिकनकर, राधिका कुलकर्णी, दीपाली तेलुरे आदी शिवसेना महिला पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. महिला जिल्हा प्रमुख छाया वाघमारे, पुष्पा ठाकरे, राधिका गुप्ते, माधुरी काळे, राजवंती मढवी, सारिका जाधव, पल्लवी बांदोडकर, संगीता गायकवाड आदी महिला पदाधिकार्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तर शहर प्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, रमाकांत देवळेकर, हर्षवर्धन पालांडे यांसह सर्व महिला उपशहर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

यावेळी महिलांनी पारंपारिक भोंडला गाणी, हळदी-कुंकू विधी आणि वेशभूषा प्रदर्शनाद्वारे सांस्कृतिक विविधता प्रदर्शित केली. वेशभूषा स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे “केळंबा देवी खरोशी मंदिर” या थीमवर आधारित वेशभूषा करण्यात आली. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण जवळील खरोशी गावात असलेल्या केळंबा देवी मंदिरापासून प्रेरित पोशाख होते, जे देवीच्या एका अद्वितीय रूपाला समर्पित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी, विजेत्यांना स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच, उपस्थित असलेल्या सर्व महिलांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून दिवाळी भेट म्हणून पैठणी साड्या देण्यात आल्या, ज्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech