ठाणे : ठाणे जिल्ह्यात नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीररित्या दिलेले सुमारे १,००० जन्म प्रमाणपत्र १५ दिवसांच्या आत रद्द करून, मूळ प्रमाणपत्र परत मिळविले जाईल असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्पष्ट केले. बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या विषयात मी व आमदार श्री. निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, कल्याण, भिवंडी…. विभागातील तहसीलदार, महापालिका अधिकारी व अन्य अधिकाऱ्यां सोबत विस्तृत चर्चा केली. ठाणे जिल्ह्यातील विलंबित जन्म प्रमाणपत्रासाठी आलेला प्रत्येक अर्ज पूर्णपणे तपासला जाणार व ठाणे जिल्ह्यात जन्म झाल्याचे पुरेसे पुरावे असल्याशिवाय मान्यता दिली जाणार नाही असे देखील जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.