त्र्यंबकेश्वरात रथोत्सव उत्साहात साजरा

0

त्रंबकेश्वर : येथे त्रिपुरी पौर्णिमा त्र्यंबकेश्वर रथोत्सव उत्साहात संपन्न झाला. त्र्यंबकेश्वराची सुवर्ण मूर्ती असलेला रथ ब्रम्हदेव ओढत आहे असा धार्मिक संदेश या वैभवशाली सोहळ्यातून भाविका पर्यंत पोहचला रथोत्सवाचे मुख्य आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून करणेत आले होते. २७ फूट उंच अशा भव्य रथाला विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली होती तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील मोठ्या प्रमाणावर विद्युत रोशनाई करण्यात आली होती.

त्र्यंबकेश्वराची पालखी होती त्यात भगवान शिवाचा मुखवटा होता. सवाद्य मिरवणूकित मोठ्या प्रमाणावर भाविक सामील होते. प्रारंभी त्र्यंबकेश्वराची आरती करण्यात आली. आणि रथाला जय त्र्यंबक राजचे जय घोषात प्रारंभ झाला. या वेळी नगरीतील मान्यवर मंदिर ट्रस्टची संबंधित मानकरी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त पुजारी सामील झाले. सवाद्य मिरवणूक मार्गावर मोठं मोठ्या रांगोळ्या तसेच फुलाच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या रथ मिरवणूक स्वागतासाठी नगरीतील विविध मंडळाकडून असे नियोजन करण्यात आले होते. रथावर मोठ्या प्रमनवर पुष्पृष्टी करण्यात आली.

भगवान शिवाचा जयजयकार शंख नाद सवाद्य मिरवणूक बैलाच्या 5 सजवलेल्या जोड्यानी रथ ओढला.त्रंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त अधिकारी वर्ग सूचना देऊन होते होमगार्ड पोलीस पथकाचा बंदोबस्त तैनात होता. त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायमूर्ती सचिन भन्साळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडला. विश्वासत मंडळ लक्ष देवून होते. यंदा रथाला बैलांच्या पाच जोड्या लावण्यात आल्या होत्या. यात मानाचा देखील बैल जोड्या होत्या .रथ कुशावर्त तीर्थावर आल्यानंतर गोदावरी तीर्थाने त्र्यंबकेश्वर मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. विश्वस्त कैलास घुले मनोज थेटे रूपाली भुतडा सत्यप्रिय शुक्ल स्वप्निल शेलार पुरुषोत्तम कडलग , सचिव राहुल पाटील प्रदीप तुंगार असे विश्वासत मंडळ कार्यरत होते.

तुंगार ट्रस्ट, शागीर्द मंडळी देवस्थानचे अधिकारी मचावे व सहकारी , सुरक्षा बलाचे कर्मचारी, सुनीलशेठ अडसरे, दिलीप रुईकर, रवींद्र अग्निहोत्री वाडेकर तसेच गणपत कोकणे यांची उपस्थिती होती. पेढ्याचा प्रसाद वाटण्यात आला यासाठी ट्रस्ट कर्मचारी शिपाई यांनी परिश्रम घेतले. हजारो रुपये यांच्या नयनरम्य अशा फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली. महिला भाविकांनी मंदिरात त्रिपुरवाती लावल्या. रथावरील नियंत्रण सुटू नये यासाठी दक्षता घेण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech