निसर्ग कोपला परतीच्या पावसाचा हाहाकार
मुरबाड : गेल्या सात दिवसा पासून महाराष्ट्रभर पावसाने धुमाकुळ घातल्याने हातातोंडाशी आलेली पिक भूईसपाट झाली आहेत, वादळी वा-यात काहीची घर कोसळून बेघर झाली घरात पाणी शिरूण जीवनावश्यक वस्तु भिजून गेल्या विजपडून लाईटच्या तारा तुटून गुरांची जिवित हानी झाली,उभी भातपिक आडवी झाल्याचे पहात हे अस्मानी संकट शेतकरी वर्गा सह सर्वसामान्य माणसांना उद्धवस्त करणारे ठरले असल्याने ठाणे जिल्हा भरात देखील मुरबाड-शहापुरातील ग्रामिण भागात फटका बसून आल्याने शासनाने जिल्हाधिकारी महसुल विभागा कडून या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी सर्वांसामान्य नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाने करून त्याना शासकिय मदतीचा हात देण्यासाठी संबधीत विभागातील महसूल कर्मचारीना जागेवर जाऊन पंचनाने करण्याचे आदेश देण्याची मागणी शिवसैनेचे नेते प्रकाश पाटलांनी केल्याचे प्रसारमाध्याना सांगितले ,विशेष म्हणजे शेतकरी हा जंगाचा पोशिंदा असला तरी तो निसर्गा समोर नेहमी हतबळ ठरतो व निसर्गाचा कहरत़्यावरच बरसत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहावयास मिळत असून ठाणे जिल्हातील शेतकरी या नैसर्गिक कोपाला बळी ठरले आहेत या स्तव राजकीय चपला बाजूला ठेवून शेतक-या वाईट दिवसात त्याला साथ देण्यासाठी एकत्र येण्याची कळकळीची विनती नेते प्रकाश पाटलांनी केली आहे, सोबत आपल्या परीने जेवढी मदत करता येईल त्या साठी मदतीचा हात पुढे करण्यासाठी आपलं मोलाच योगदान ठरणार आहे.