कल्याण : प्रफुल्ल शेवाळे
संपूर्ण महाराष्ट्र चे लक्ष वेधून घेणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज दि. २९ जून रोजी अंत्यत चूरशी मध्ये पार पडली. कल्याणमध्ये कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मविआ आणि महायुतीमध्ये आज निवडणूक घेण्यात आली होती. राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागा करिता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. यामध्ये एक जागा बिनविरोध झाल्याने उरलेल्या १७ जागांसाठी मतदान पार पडले. आहे.यामध्ये शेतकरी सेवा सोसायटी – ११ जागा, ग्रामपंचायत – ४ जागा, व्यापारी मतदार संघ – २ जागा, आणि हमाल/माथाडी गट – २ पैकी १ जागा बिनविरोध अशा प्रकारे विभागणी होती.
महायुतीचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी आत्मविश्वास व्यक्त करत म्हटलं होतं की “अठराच्या अठरा जागा आम्ही जिंकणार, आमचा विजय निश्चित आहे. ही निवडणूक नाममात्र आहे.” तर महाविकास आघाडीचे नेते म्हणाले की, “बाजार समितीच्या दुरवस्थेवर मतदार नाराज आहेत आणि या नाराजीचा फायदा आम्हाला मिळेल. आमचा विजय निश्चित आहे. असा विश्वास व्यक्त केला होता. आज मतदान पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणी पार पडली. यामध्ये महायुतीचे १६ उमेदवार (एक बिनविरोध) विजयाचे मानकरी झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे आणि रवींद्र घोडविंदे यांनी बाजी मारली तर महाविकास आघाडी च्या शिवसेना उबाठा मधून नरेश सुरोशी आणि एक अपक्ष उमेदवार यांनी मजल मारली आहे.
यामध्ये महायुतीच्या विजयी उमेदवार यांच्या समर्थनात ढोल ताशे, फटाके आणि गुलालाची आतिषबाजी महायुतीच्या हजारो कार्यकर्ते यांच्या मध्ये पाहायला मिळाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आणि नवनिर्वाचित विजयी उमेदवार भरत गोंधळे यांनी आपल्या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी तसेच महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांना देऊ केले आहे. मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या बहुमोल मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या मुळे आपणास आणि संपूर्ण महायुतीला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती वर विजयाची पताका फडकवता आली असं म्हटलं आहे.