अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच होणार आई- बाबा

0

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या घरी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. दोघंही लवकरच आई- बाबा होणार आहेत. कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांनी बऱ्याच काळापासून जोर धरला होता. आता खुद्द कतरिनाने पती विक्की कौशलसोबत एक सुंदर फोटो शेअर करत गोड बातमी दिली आहे. सध्या ही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.

कतरिना आणि विक्कीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना पांढऱ्या रंगाच्या स्लीव्हलेस ड्रेसमध्ये दिसते आहे आणि ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळते. विक्की कौशल तिच्या बेबी बंपवर प्रेमाने हात ठेवलेला दिसतो. फोटोमध्ये दोघंही एकमेकांचा हात पकडलेले आहेत आणि खूप आनंदी व उत्साही दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे –“आमच्या आयुष्याच्या सर्वात सुंदर पर्वाची सुरुवात होत आहे. आमचं हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेलं आहे.”कतरिना आणि विक्कीला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केलं होतं. त्यांचा विवाहसोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती आणि त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. कतरिना-विक्कीची जोडी चाहत्यांना खूप आवडते. चाहत्यांना हे कपल एकत्र स्क्रीनवर पाहायला आवडेल, अशीही अपेक्षा आहे. विक्की कौशलला शेवटचा “छावा” या चित्रपटात पाहिलं गेलं होतं. हा चित्रपट प्रचंड ब्लॉकबस्टर ठरला आणि त्याने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. आता विक्की संजय लीला भन्साळी यांच्या “लव्ह अँड वॉर” या चित्रपटात दिसणार आहे. तर कतरिना कैफ शेवटचं २०२४ मध्ये “मेरी क्रिसमस” या चित्रपटात झळकली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech