मुंबई : अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल टू मच हा एक नवीन टॉक शो घेऊन परतल्या आहेत. या शोमध्ये ट्विंकल आणि काजोलला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या नव्याकोऱ्या शोमध्ये काय काय घडते हे पाहण्यासाठी ते आतुर आहेत. नुकतेच या शो चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे जे पाहून चकीत झाले आहेत. काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या या नवीन शोची घोषणा अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज(दि.२२) केली आहे. हा एक टॉक शो असेल. आज, अमेझॉन प्राइम व्हिडिओने इन्स्टाग्रामवर काजोल आणि ट्विंकलचा ‘टू मच’ या नवीन शोची घोषणा करतानाचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘त्यांनी चहा घेतला आणि तो चुकवण्यासारखा आहे. #TwoMuchOnPrime लवकरच येत आहे.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आणि त्यांना खुश करून टाकले आहे.ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या या शोबद्दल सेलिब्रिटी आणि चाहते खूप उत्सुक आहेत.
काजोल आणि ट्विंकल लवकरच प्राइम व्हिडिओवर ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ हा नवीन टॉक शो घेऊन येत आहेत. या शोची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. या शोची निर्मिती बनिजय एशिया करत आहे आणि बॉलीवूड आणि इतर उद्योगातील अनेक मोठ्या व्यक्तींशी मजेदार, स्पष्ट आणि भावनिक संवाद साधणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो अनोखा असेल. हा शो कॉमेडी, ग्लॅमर आणि स्पष्टवक्तेपणाचा मिलाफ असणार आहे. दोन्ही अभिनेत्री त्यांच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे, हा शो प्रेक्षकांसाठी एक ताजा आणि मनोरंजक अनुभव नक्कीच असणार आहे.