बिग बॉस फेम अब्दु रोजिकला दुबईत अटक

0

दुबई : बिग बॉस फेम आणि ताजिकिस्तानी गायक आणि सोशल मीडिया स्टार अब्दु रोजिकला शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. अब्दु मॉन्टेनेग्रोहून दुबईला पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. अब्दूच्या अटकेचे कारण अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. दुबई अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. दरम्यान, अब्दू रोजिकच्या व्यवस्थापन कंपनीने त्याला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

अब्दु रोजिक हा एक प्रसिद्ध ताजिकिस्तानी गायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्याची गाणी, व्हायरल व्हिडिओ आणि रिअॅलिटी शोमुळे त्याची लोकप्रियता वाढली. बिग बॉस १६ नंतर तो भारतात खूप लोकप्रिय झाला होता. दरम्यान, २०२४ मध्येहीईडीने भारतात अब्दू रोजिकचीही चौकशी केली होती. हा खटला एका हॉस्पिटॅलिटी कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित होता. त्यावेळी अब्दूला या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले नव्हते तर त्याची फक्त चौकशी करण्यात आली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech