अहमदाबाद : गुजराती चित्रपट निर्माते महेश जिरावाला प्रॉडक्शन्सचे सीईओ महेश जिरावाला यांचे अहमदाबाद विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. डीएनए चाचण्यांमुळे त्यांची ओळख पटली आहे. अपघातस्थळी त्यांची जळालेली स्कूटर आणि मोबाईल फोन सापडला आहे. गुजराती चित्रपट निर्माते महेश कलावडिया उर्फ महेश जिरावाला यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नीने सांगितले होते की त्यांच्या फोनच्या शेवटच्या लोकेशननुसार चित्रपट निर्माते अपघातस्थळापासून ७०० मीटर अंतरावर उपस्थित होते. त्यांनी गृहीत धरले होते की, त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाला आहे, म्हणूनच त्यांनी डीएनए नमुने देखील दिले होते. गेल्या १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी महेश जिरावाला यांची जळालेली अॅक्टिव्हा स्कूटर सापडली होती. ज्यामुळे त्यांना अपघात झाल्याचा संशय निर्माण झाला होता. त्यांचा मोबाईल फोन शेवटचा अपघातस्थळी ट्रॅक करण्यात आला होता. जिथे तो बंद आढळला होता.