नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्री शर्मिला शिंदे दिसणार तेजश्री प्रधानच्या मालिकेत

0

मुंबई : सध्या मराठी मालिकाविश्वात ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेची जोरदार चर्चा आहे. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका आहे. आता नवरी मिळे हिटलरला’ मालिकेनंतर एका छोट्या विश्रांतीनंतर शर्मिला नव्या भूमिकेत या मालिकेत दिसून येणार आहे. दरम्यान, या मालिकेत तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत आहे तर सुबोध भावे समरची भूमिका साकारणार आहे. तर शर्मिला शिंदे समरची मैत्रीण म्हणजेच निकिताच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेनंतर एका छोट्या विश्रांतीनंतर शर्मिला नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. जवळपास १ वर्ष अधिराज्य गाजवल्यावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा शर्मिलाला छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून ही मालिका दररोज संध्याकाळी ७,३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्यासह अभिनेता राज मोरे, पूर्णिमा डे तसेच किशोरी अंबिये, शर्मिला शिंदे अशा कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. शर्मिला शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘पुढचं पाऊल’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech