सीबीआयने थलापती विजयला चौकशीसाठी बजावले समन्स

0

नवी दिल्ली : करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने अभिनेता थलापती विजय यांना नोटीस पाठवली असून १२ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. थलापती विजय यांना १२ जानेवारी रोजी दिल्लीत असलेल्या सीबीआय मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी तमिळनाडूच्या करूर येथे विजय यांच्या पक्ष तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) ची एक जाहीर सभा झाली होती. या सभेदरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत किमान ४१ जणांचा मृत्यू झाला असून ११० हून अधिक लोक जखमी झाले होते. करूर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी विजय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली होती. याआधी अनेकांनी विजय यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि करूर चेंगराचेंगरीसाठी त्यांनाच जबाबदार धरले होते. आता या प्रकरणात सीबीआयकडून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech