मुंबई : क्योंकी सास भी कभी बहु थी’ ही एकता कपूरची टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली मालिका आहे.आता १७ वर्षांनी ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मालिकेचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची पहिली झलक आता समोर आली असून या मालिकेचा छोटा टीझर रिलीज करण्यात आला आहे. स्टार प्लसवरुन ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये तुलसीच्या नव्या रुपात स्मृती इराणी दिसत आहेत. प्रोमोमध्ये घराचा दरवाजा उघडताना दिसत आहे. त्यानंतर अंगणातल्या तुळशीला तुलसी पाणी घालत आहे. “वेळ आली आहे तुम्हा सगळ्यांना परत भेटण्याची”, असं या प्रोमोमध्ये तुलसी म्हणत आहे.
२९ जुलैपासून रात्री १०.३० वाजता ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’चे नवीन एपिसोड चाहत्यांना पाहता येणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मालिकेच्या सीक्वलची चर्चा होती. आता या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिकेतून स्मृती इराणी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. याच महिन्यात २९ जुलैपासून ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता फार वाट पाहावी लागणार नाहीये.