अनिरुद्धाचार्य महाराजांच्या विधानावर खुशबू पाटनीने व्यक्त केला संताप

0

नवी दिल्ली : पुकी बाबा” या नावाने ओळखले जाणारे अनिरुद्धाचार्य महाराज यांनी अलिकडेच लिव्ह-इन रिलेशनशिपवर भाष्य करताना मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर आता अभिनेत्री दिशा पटानीची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानीने संताप व्यक्त केलाय. अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खुशबूने व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. खुशबू व्हिडीओमध्ये म्हणाली, “मी त्या भाषणात असती तर, त्यांना विचारलं असतं, तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे”. पुढे तिनं म्हटलं, अनिरुद्धाचार्य राष्ट्रविरोधी आहेतजर लिव्ह इन रिलेशनशिपची समस्या आहे, तर ते मुलांवर का प्रश्न उपस्थित करत नाही. जे लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये राहण्याची निवड करतात. त्यांनी फक्त मुलींवर प्रश्न का उपस्थित केला”, असा प्रश्न खुशबूने केला. तसेच तिनं महिलांचा अपमान करणाऱ्या अशा कथनकर्त्यांना पाठिंबा देऊ नका अशी विनंती लोकांना केली. दरम्यान, अनिरुद्धाचार्य महाराजांनी लिव्ह-इन रिलेशनशिपवर भाष्य महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. ते म्हणाले होते, “जेव्हा २५ वर्षांची मुलगी येते, तेव्हा ती पूर्ण प्रौढ असते. सर्वच नाही, तर अनेकांनी आधीच कोणाशी तरी ४-५ ठिकाणी संबंध ठेवले असतात”.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech