फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग

0

मुंबई : मुंबईतील फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी(२३ जून) सकाळी फिल्म सिटीमध्ये ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. या आगीत मालिकेचा सेट संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी सेटवरील उपस्थित लोकांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर आज, सोमवारी(दि.२३) सकाळी अचानक आग लागली. यावेळी सेटवर काही लोक उपस्थित होते. त्यांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात आलं आहे.

सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.सोशल मीडियाच्या अनेक साईटवर सेटवर लागलेल्या या आगीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘अनुपमा’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य भूमिकेत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मराठीतील आई कुठे काय करते या मालिकेचा ‘अनुपमा’ मालिका रिमेक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech