मुंबई : सुपरस्टार सलमान खान सध्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो लडाखमध्ये होता. या दरम्यान सलमान खान जखमी झाला होता. मात्र, तरीही त्यांने शूटिंग शेड्यूल पूर्ण करून मुंबईला परतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, “लडाख शेड्यूलने संपूर्ण टीमच्या संयमाची परीक्षा घेतली. सलमान खान आणि संपूर्ण क्रूने लडाखमध्ये -१० अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानात शूटिंग पूर्ण केलं. शरीराला लागलेल्या जखमा आणि कमी ऑक्सिजन लेव्हल असूनही, सलमानने या कठीण परिस्थितींचा खंबीरपणे सामना केला.”
लडाखमध्ये ‘बॅटल ऑफ गलवान’चं शूटिंग पूर्ण केल्यानंतर आता सलमान मुंबईतील शेड्यूलसाठी तयारी करत आहेत. मुंबई शेड्यूल पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. या भागात जबरदस्त अॅक्शनसोबत भावनिक प्रसंगांचाही समावेश असेल. टीमने तब्बल ४५ दिवस रिअल लोकेशन्सवर अॅक्शन आणि ड्रामॅटिक सीनचे शूटिंग पूर्ण केले आहे, त्यापैकी १५ दिवस सलमान खान स्वतः सेटवर उपस्थित होता. शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतींमुळे आता मुंबई शेड्यूल सुरू करण्यापूर्वी सलमान थोडा आराम घेऊ इच्छित आहेत. त्यामुळे तो सध्या एक छोटा ब्रेक घेत आहेत.
मुंबई शेड्यूलमध्ये चित्रपटाच्या अनेक बारकाव्यांवर फोकस केला जाणार आहे आणि अनेक भावनिक दृश्यांचं शूटिंग केलं जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत.सलमान खानने जुलै महिन्यात ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांनी याचा मोशन पोस्टरही शेअर केला होता. मात्र, अद्याप चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. सलमान खानच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, ‘बॅटल ऑफ गलवान’ व्यतिरिक्त तो बिग बॉस १९ मध्येही झळकत आहेत. सलमान खान बिग बॉस १९ चे होस्ट आहे. मागच्या आठवड्यात ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये तो दिसला नव्हता कारण तो लडाखमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त करत होता.