सलमान खानचा खास बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचं निधन

0

मुंबई : सलमान खानचा खास बॉडीगार्ड म्हणून प्रसिद्ध असलेला शेरा उर्फ गुरमीत सिंह जॉलीचे वडील सुंदर सिंह जॉली यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते, पण अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेराने आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली.

शेराने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहलं कि, “पप्पा… तुम्ही माझी प्रेरणा होता, माझी ताकद होता.” शेराच्या या भावनिक पोस्टमधून त्याचं वडिलांशी असलेलं भावनिक आणि प्रेमळ नातं पाहायला मिळतं.शेराचे वडील सुंदर सिंह जॉली यांचं मुंबईतील ओशिवरा येथे राहत्या घरी निधन झालं. संध्याकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

शेरा हा सलमान खानसोबत तीन दशकांहून अधिक काळापासून आहे. तो फक्त एक बॉडीगार्ड नाही, तर सलमान खानसाठी कुटुंबाचा सदस्य आहे. प्रत्येक कार्यक्रम, शूटिंग, किंवा प्रवासात शेरा सलमानसोबत असतो. त्यामुळे शेराच्या वडिलांच्या निधनामुळे सलमान खानही भावुक झाला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech