1 महाराष्ट्रचे प्रतिनिधी पत्रकार प्रफुल्ल शेवाळे यांच्याकडे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदाची जबाबदारी…

0

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया कडून जिल्हाध्यक्ष पदाच्या नेमणूका…

मुंबई : मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सोशल मीडिया सेल च्या राज्यातील प्रदेश पदाधिकारी,विविध जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेमणुका दि. १३ मे रोजी करण्यात आल्या. यावेळी 1 महाराष्ट्रचे प्रतिनिधी पत्रकार प्रफुल्ल शांताराम शेवाळे यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मागील वर्षभरातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तसेच महायुती च्या विविध बातम्या, भूमिका प्रफुल्ल शेवाळे यांच्या कडून शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल अध्यक्ष या नात्याने मीडिया पेज द्वारे व्यक्त करण्यात आल्या होत्या. शेवाळे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत (भाऊ ) गोंधळे यांनी सोशल मीडिया प्रदेश अध्यक्ष आनंद पवार यांच्या कडे शिफारस केली, आणि प्रफुल्ल शेवाळे यांच्या कडे ठाणे जिल्हा ग्रामीण सोशल मीडिया अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

ठाणे ग्रामीण मध्ये येणाऱ्या सहा विभागात आपलं सोशल मीडिया चे वलंय जास्तीत जास्त नेटाने पसरवून, अतिशय जबाबदारीने आपली योग्य ती भूमिका प्रभावशाली पणाने व्यक्त करीत राहू असं मत प्रफुल्ल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव तसेंच शहापूर तालुका आमदार दौलत दरोडा यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या बहुमोल मार्गदर्शनपर आभार व्यक्त करीत, भरत (भाऊ)गोंधळे यांचे विशेष आभार मानून इतर पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष सौ. कल्पना तारमळे, प्रदेश चिटणीस डी. के. विशे सर,शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे,प्रांतिक सदस्य रवींद्र परटोळे यांचे सुद्धा आभार प्रफुल्ल शेवाळे यांनी व्यक्त केले आहेत.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech